मधुमेहींसाठी उद्या संगमनेरात व्याख्यान
संगमनेर (प्रतिनिधी), दि. 10 - श्री.माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्रात सुरु असलेल्या मधुमेह नियंत्रित भारत उपक्रमातंर्गत आयुष मंत्रालय व एस.व्यासा विद्यापीठाच्या सहकार्याने मधुमेहींसाठी उद्या गुरुवार दिनांक 11 मे रोजी मालपाणी लॉन्स येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एस. व्यासा विद्यापीठाचे उपाध्यक्ष रामकुमार राठी उपस्थित राहणार आहेत.
गेल्या 12 जानेवारीपासून सुरु झालेल्या या अभियानात सहभागी झालेल्या आठशे मधुमेहींच्या रक्त तपासणीचे अहवालही यावेळी वितरीत केले जाणार आहेत. या व्याख्यानाचा मधुमेहींनी लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी यांनी केले आहे.
या अभियानात सहभागी झालेल्या सुमारे आठशे मधुमेहींच्या रक्ताची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीसाठी होणारा प्रत्येकी सातशे रुपयांचा खर्चही आयुष मंत्रालयाने केला होता. सदरच्या रक्त तपासणी अहवालांचे वितरणही उद्या गुरुवारी सायंकाळी 6 वा. मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड, संगमनेर येथे होणार्या या व्याख्यानाचा मधुमेहींनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री.माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्र प्रमुख डॉ.ललितबिहारी जोशी यांनी केले आहे.