बसस्थानकात चोरट्याने महिलेचे 5 तोळ्याचे सोने चोरले
संगमनेर (प्रतिनिधी), दि. 10 - शहरात चोर्यांचे सत्र सुरुच असून मागील आठवड्यात जालेल्या चोरीचे प्रकरण ताजे असतांना सासरी जाणार्या महिलेच्या पर्समधून साडेपाच तोळे सोन्याची चोरी करुन चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना रविवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सौ. दर्शना प्रविण गायकवाड (वय 26, रा. म्हसवंडी) ही महिला नाशिक जिल्ह्यातील अंबड येथे माहेरी गेली होती. तयानंतर सदर महिला अकोल्याहून संगमनेरला आली. बसस्थानकातून त्या आपल्या सासरी म्हसवंडीकडे निघाल्या होत्या. रविवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास त्यांची बस लागली. त्या बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर्स उचकटून त्यातील साडेतीन तोळ्याचे गंठण व 2 तोळ्याची चैन चोरून नेवून पोबारा केला. आपली चोरी झाल्याचे त्यांना समजताच त्यांनी आरडा-ओरड केला. मात्र चोरटे तोवर पसार झाले होते. या संदभा,त शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल रफीक पठाण करीत आहे.
दरम्यान लग्नसराई असल्यामुळे बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवासासाठी गर्दी उसललेली आहे. त्यात विद्यार्थ्यांना सुट्या सुरु असल्याने गर्दीत आणखी भर पडत आहे. याचा फायदा घेत चोरटे संधी साधत आहे. धुमस्टाईलने दागिने लांबविण्याचे सत्र सुरुच असून आता चोरट्यांनी आपला मोर्चा लग्नकार्य, गर्दीच्या ठिकाणी वळवला आहे. लग्नसराईमुळे महिला मोठ्या प्रमाणावर दागिने आणत असल्याने त्यांना चोरटे टार्गेट करत आहे. पोलिसांच्या संख्या बळाची कमतरता चोरटे उठवत आहेत. बसस्थानकातील चौकी पुन्हा सुरु करुन तेथे पोलिसांची नेमणूक करन्यात यावी. जेणे करुन चोर्या कमी होतील. अशी मागणी नागरीक करीत आहे.