Breaking News

शिवसेनेने घातला दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार

नाशिक, दि. 11 - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्यव्याचा निषेध म्हणून येवल्यात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. शेतकरी संकटात असतांना शेतकरीविरोधी बोलून दानवेंनी शेतकर्‍यांचा अपमान यांनी केल्याचा आरोप यावेळी शिवनसेने केला. येवला तालुक्यातील शिवसैनिक विंचुर चौफुलीवर जमा झाले आणि घोषणाबाजी केली. यावेळी रावसाहेब दानवे यांचा धिक्कार करीत घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काहीकाळ राज्य महामार्गावरील वाहतूक रोखली गेली होती.