मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील दुचाकींची संख्या 40 लाखावर
मुंबई, दि. 11 - मुंबई महानगरीय प्रदेश म्हणजेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील दुचाकींचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. सरकारी आकडेवारीनुसार मुंबई मेट्रोपोलिटनमधील टू व्हीलर्सची संख्या लवकरच 40 लाखांचा टप्पा ओलांडणार आहे.
चीनला मागे टाकून भारत दुचाकींची सर्वात मोठी बाजारपेठ ठरणार आहे. एका वरिष्ठ वाहतूक अधिकार्याच्या माहितीनुसार आजच्या घडीला मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील एकूण बाईक आणि स्कूटरची संख्या 39.2 लाख इतकी झाली आहे. येत्या काही आठवड्यात 40 लाखांचा टप्पा गाठला जाईल. एका महिन्यात एकट्या मुंबईतच दुचाकींनी दहा लाखांचा टप्पा ओलांडला. 6.4 लाख स्कूटर आणि 34 हजार मोपेड्सचा समावेश आहे.