Breaking News

निर्भया प्रकरणातील आरोपी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर करणार

नवी दिल्ली, दि. 11 - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील शिक्षा सुनावलेले चारही आरोपी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज सादर करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींना शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा टाळण्यासाठी ते राष्ट्रपती मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज सादर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या आरोपींनी तुरूंगातील काम करणे सोडून दिले आहे. न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाविरोधात दोषींकडून पुनर्विचार याचिका देणार असल्याची माहिती आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी दिली. न्यायालयाने जर पुनर्विचार याचिका फेटाळली तर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अक्षय ठाकूर, पवन कुमार, मुकेश कुमार आणि विनय शर्मा या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.