Breaking News

नदीखालून जाणा-या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार

कोलकाता, दि. 30 - नदीखालून जाणा-या देशातील पहिल्याच मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत  आहे. हा मार्ग हावडा ते कोलकाता या दरम्यान असणार आहे. नदीखालील हा मार्ग कोलकाता रेल्वेच्या 16.6 किलोमीटरमधील उत्तर-पश्‍चिम मेट्रो प्रकल्पातील  महत्वाचा प्रकल्प आहे.
हे सुरुंग 520 मीटर लांबीचा दुहेरी मार्ग आहे. यामध्ये एक मार्ग पुर्वेकडील दिशेने जाणारा असून दुसरा मार्ग पश्‍चिम दिशेस जाणार आहे. हा मार्ग नदीच्या तळापासून  30 मीटर खोल अंतरावर आहे. या प्रकल्पासासाठी 60 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून अंदाजे 9 हजार कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित आहे.