खासदार हीना गावित दुसर्यांदा ‘संसदरत्न’
नंदुरबार, दि. 30 - देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, चर्चांमध्ये सर्वात जास्त सहभाग तसेच खासदार निधीचा योग्य वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल खासदार हीना गावित यांना पंतप्रधान पॉईंट फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित केले गेले. चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा पार पडला.
देशातील एकूण सहा खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला. केरळचे राज्यपाल पी. सदाशीवम यांच्या हस्ते सहा खासदारांना हा पुरस्कार देण्यात आला. दिल्लीतल्या राजकारणाचा अनुभव नसताना आपल्या कुशलतेने आदिवासीचे प्रश्न, सुरत-भुसावळ रेल्वे दुहेरी मार्ग, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण अशा अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावल्याने यंदाही हीना गावित यांना पुरस्कार देण्यात आला.