माजी केंद्रीय मंत्र्याचा विनायक मेटेंच्या शिवसंग्राममध्ये प्रवेश
मुंबई, दि. 30 - माजी केंद्रीय मंत्री आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी ‘शिवसंग्राम’मध्ये प्रवेश केला आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद पक्षात प्रवेश केला.
सुबोध मोहिते यांचे विदर्भातील सहकारी 9 जूनला शिवसंग्राम पक्षात प्रवेश करतील. खासदार सुबोध मोहिते हे शिवसेना पक्षात असताना केंद्रीय मंत्री होते. त्यांनतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2014 मध्ये त्यांचा रामटेक विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर आज त्यांनी शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला आहे.