राज्यातील भाजप, शिवसेना, मित्रपक्षांचे सरकार निरुपयोगी - सचिन सावंत
मुंबई, दि. 05 - राज्यातील भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांचेनिरूपयोगी आहे. या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मताशी काँग्रेस पक्ष सहमत आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केले आहे.
उध्दव ठाकरे यांच्या सरकारबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले , राज्यातील सरकारची विश्वासार्हता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरत आहे. राज्यातील शेतक-यांचा प्रश्न अतिशय उग्र झाला आहे. या सर्व परिस्थितीमुळे जनतेत असंतोष वाढत चालला आहे. सत्तेत सहभागी असलेले सहयोगी पक्ष जनतेचा असंतोष पाहून सरकारविरोधात आंदोलन करू लागले आहेत. या आंदोलनात ज्या प्रकारचे शब्द वापरले जात आहेत ते पाहता सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर बेबनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंत्रीमंडळातील मंत्रीच सरकारविरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत. अशा त-हेचे विदारक आणि विसंवादी चित्र महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दिसले नाही.
शिवसेना व इतर घटक पक्षांनी या निरूपयोगी सरकारमध्ये निरूपयोगी होऊन राह्षा तात्काळ बाहेर पडून आपण काहीतरी उपयोगी आहेत, हे जनतेला दाखवून द्यावे असा टोलाही प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला.