नेता बनायचे असेल तर चांगला कार्यकर्ता बना - रामदास आठवले
मुंबई, दि. 05 - नेता बनायचे असेल तर आधी चांगला कार्यकर्तालागेल . निस्वार्थपणे ; निर्पेक्षबुद्धिने लोकांसाठी काम करीत रहा म्हणजे लोकच तुम्हाला आपला नेता मानतिल मात्र नेता होऊन काम कराल तर लोक तुम्हाला नेता माननार नाहीत. नेता होण्यासाठी आधी कार्यकर्ता होऊन काम करा असे सांगत डॉ बाबासाहेब अम्बेडकारांच्या निळ्या झेंड्याचा रिपाइंचा राजस्थानातील गावागावात प्रसार करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले .
जयपुर येथील खण्डेलवाल सभागृह येथे राजस्थान मधील रिपाइंच्या कार्यकार्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ना. रामदास आठवलेंनी मार्गदर्शन केले . यावेळी विचारमंचावर श्री गोपाल डेनवाल श्री राधामोहन सेनी श्री नरसिंघ पटेल आणि अनेक मान्यवर उपस्थित होते .तसेच येथे 8 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा ना . रामदास आठवलेंच्या उपस्थितीत पार पडला . सामूहिक विवाह सोहळ्यात सहभाग घेतलेल्या जोडप्यांचा ना रामदास आठवले यांनी आशीर्वाद देऊन अभिनन्दन केले . सामूहिक विवाहसोबत च समाजात अन्तरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन जातिभेद मिटविन्यासाठी समाजातील जागृत नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले .
दरम्यान पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सीमारेषेवर घूसखोरी करून केलेल्या हल्ल्याचा तसेच त्यात शहीद झालेल्या भारतीय सैनीकांच्या मृतदेहांच्या पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या वीटम्बनेचा रिपाइं च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून पाकिस्तानला एकदा कायमचा धड़ा भारताने शिकविन्याची गरज असल्याचे ना . रामदास आठवले यांनी मत व्यक्त केले.