Breaking News

माफी मागणार नाही, पक्षातील चुका दाखवत राहणार - कुमार विश्‍वास

नवी दिल्ली, दि. 03 - मला पक्षात कोणतेही पद नको, मुख्यमंत्री पदही नको. मात्र पक्षातील चुकांकडे कानाडोळा करू शकणार नाही, चुका दाखवत राहणार, असे आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्‍वास म्हटले. ‘हम भारत के लोग’ या चित्रफितीबाबत माफी मागणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी कुमार विश्‍वास हे संघ आणि भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर कुमार विश्‍वास यांनी आज पत्रकार परिषद बोलवून आपली मते मांडली. बाहेरच्या पक्षातून आलेल्या व्यक्तीवर विश्‍वास ठेवले जाईल असे वाटले नव्हते. असे आरोप त्यांनी केजरीवाल किंवा सिसोदिया यांच्यावर केले असते तर आत्तापर्यंत त्यांना पक्षातून बाहेर काढले असते असे ते म्हणाले.
केजरीवाल, सिसोदिया आणि मी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाचे स्वप्न बघितले होते, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांचा आदर करा कारण त्यांनी नोकरी-धंदे सोडून तुम्हाला साथ दिली आहे, असेही ते म्हणाले. याप्रकरणी आज रात्रीपर्यंत मोठा निर्णय घेईन असेही ते म्हणाले.