पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य - केंद्र सरकार
नवी दिल्ली, दि. 03 - पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असून ते अनिवार्य असल्याची भूमिका केंद्र सरकारच्यावतीने न्यायालयात मांडण्यात आली. पॅन कार्डला आधार जोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज झाली. केंद्र सरकारच्यावतीने अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली.
आधार कायद्याच्या कलम 7 अनुसार विविध योजनेसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ही बाब याचिकाकर्ते समजून घेत नाहीत, असे ते म्हणाले. कोणीही बनावट आधार कार्ड बनवू नये, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. आत्तापर्यंत देशभरात 113. 7 कोटी जनतेने आधार कार्ड बनवले आहे आणि अद्यापही बनावट आधार कार्ड बनवल्याची कोणतीही तक्रार सरकारकडे आलेली नाही. तर दुसरीकडे 10 लाख बनावट पॅन कार्ड आढळली असून ती सरकारकडून रद्द करण्यात आली आहेत. देशभरातून आत्तापर्यंत 29 कोटी पॅन कार्ड बनवण्यात आली आहेत. यापैकी फक्त 5 कोटी करदाते आहेत. उर्वरित 24 कोटी पॅनकार्ड फक्त ओळखपत्र म्हणून बनवण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. पॅन कार्ड बनवण्यासाठी रेशन कार्ड, वाहन परवाना अशी काही अन्य ओळखपत्रे मागितली जातात, जी बनावटही असू शकतात. यासाठी पॅनकार्ड किंवा कर परतावा भरण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले. उद्याही या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहेत.