Breaking News

पाकिस्तानला आता धडा शिकवलाच पाहिजे -डॉ . सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली, दि. 03 - भारताने पाकिस्तानविरोधात आता कठोर कारवाई केली पाहिजे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी व्यक्त केली. पाकिस्तानने दोन भारतीय शहीद जवानांच्या मृतदेहांची ची विटंबना केल्यानंतर स्वामी यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानचे 42 लष्करी तळ आहेत. हवाई दलाच्या जवानांना आदेश देऊन तेथील सर्व तळ उद्धवस्त केले पाहिजे. पाकिस्तानचे चार भागात विभाजन करण्यासाठी भारताने योग्य रणनीती आखणे गरजेचे आहे, असेही स्वामी म्हणाले.