रयत शिक्षण संस्थेतील हंगामी सेवकांचे बेमुदत आमरण उपोषण
सातारा, दि. 09 - रयत शिक्षण संस्थेतील हंगामी सेवकांनी अनुदानित, विनाअनुदानित पदावर कायम करण्यासह विविध मागण्यांसाठी संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्राही त्यांनी घेतला आहे.
रयत शिक्षण संस्थेतील हंगामी कर्मचारी रयत कृती समितीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. संस्थेत कर्मवीर पुण्यतिथी साजरी होत असून त्यानिमित्त विविध मान्यवर येणार असल्याच्या पार्श्वाभूमीवर हे आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर कुटुंबीयासह आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा मार्ग स्वीकारला जाणार असून जोपर्यंत लेखी ठराव करून हंगामी सेवकांच्या समायोजनासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशाराही रयत कृती समितीच्यावतीने देण्यात आला.
आंदोलनकर्त्या कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्या मांडल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेत हंगामी सेवक गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. ते अल्प मानधनावर काम करत आहेत.संबंधित हंगामी कर्मचारी अनुदानित व विनाअनुदानित पदांवर अनेक वर्षांपासून नियमित सेवेपासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळे संस्थेकडून उच्च न्यायालय व शासन निर्णय यांचा एकत्रितरित्या अवमान केला जात असल्याचे या कर्मचा-यांचे म्हणणे आहे. शासन निर्णय 1 ऑगस्ट 2014 नुसार प्रस्तावित पद मंजूर झाले असल्यास त्या पदावर सलग कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचा पूर्णवेळ शिक्षणसेवक नियुक्त्या देऊन त्याच कर्मचा-यांची मान्यता घेण्यात यावी. विनाअनुदानित पदावर काम करणा-यां कर्मचा-यांना पूर्णवेळ स्केलच्या नियुक्त्या देण्यात याव्यात. शाळांचे मुल्यांकन निकष निश्चित करणे व कायम शब्द वगळून मुल्याकंनानुसार टप्पा अनुदान प्राप्त करणे व त्यामुळे विनाअनुदानित विषयनिहाय काम करणार्याश कर्मचा-यांना त्या त्या पदावर पूर्णवेळ स्केलच्या नियुक्त्या द्याव्यात, 1 वर्ष उलटून गेले तरी हंगामी सेवकांना विना सीईटी नियमित करू असे सांगण्यात आले. मात्र कोणत्याही मागण्याबाबत ठोस कार्यवाही न केल्याने हे आंदोलन छेडण्यात आले आहे.