शेतकर्यांचा अंत पाहू नका, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
औरंगाबाद, दि. 08 - शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला आजपासून औरंगाबादमधून सुरुवात झाली आहे. यानिमित्त औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला सरकारला लक्ष केलं. शेतकर्यांचा अंत कुणीही पाहू नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला दिला.
शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘मी कर्ज मुक्त होणार’ आंदोलन राबवणार असल्याचं सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शेतकर्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. त्यासाठी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाअंतर्गत ‘मी कर्जमुक्त होणार’ ही संकल्पना राबवणार आहे. तसेच शेतकर्यांचा अंत म्हणजे, आपल्या सर्वांचा अंत आहे. त्यामुळे शेतकर्यांचा अंत कुणीही पाहू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच तूर खरेदीसंदर्भात घातलेल्या अटी शिथिल करुन मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकर्याची सर्व तूर राज्य सरकारने खरेदी करावी, असं ते यावेळी म्हणाले.
याशिवाय उद्धव ठाकरेंनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली. सध्या राज्यात यात्रेचं पेव फुटले आहे. विरोधी पक्षात गेल्यावर काहीजणांना शेतकर्यांचं दु:ख दिसू लागलं आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.