यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही : सुरेश जैन
जळगाव, दि. 08 - तब्बल 9 वेळा आमदार राहिलेल्या जळगावच्या सुरेश जैन यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जळगावात एका कार्यक्रमात बोलताना सुरेश जैन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. गेल्या काही दिवसांपासून ते निवडणूक लढवणार का, याबाबत चर्चा रंगली होती. जळगावमधील घरकूल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना तुरुंगवास भोगावा लागला. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
सुरेश जैन यांनी 1980 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. त्यानंतर 1999 मध्ये सुरेश जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ मनगटावर बांधलं. मात्र राष्ट्रवादीनंतर सुरेश जैन यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या राजकीय कारकीर्दीत सुरेश जैन यांनी अनेक मंत्रिपद भूषवली आहेत. सध्या भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेले एकनाथ खडसे यांचे राजकीय वैरी अशीही सुरेश जैन यांची ओळख आहे.