Breaking News

कन्येच्या शाही विवाह सोहळ्यावर खासदार काकडेंची सारवासारव

पुणे, दि. 08 - भाजप खासदार संजय काकडेंची कन्या आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाच्या शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडत आहे. लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्यानं काकडेंवर टीकेची झोड उठली. त्यानंतर काकडेंनी सारवासारव करण्यासाठी आपली बाजू मांडली आहे.
राज्यातील गरजू मुलांना आपण तब्बल एक कोटींची मदत करणार आहोत. यासाठी 100 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे, असं स्पष्टीकरण काकडे यांनी दिलं आहे. जिल्हाधिकार्‍यांकडे धनादेश सुपूर्द केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
न्यूकोपरे गावातील रहिवाशांचं पुनर्वसन झालेलं नसतानाही काकडे मुलीच्या लग्नात लाखोंची उधळपट्टी करत असल्याने टीका झाली होती. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करुन एक प्रकारे काकडेंनी या प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे.