Breaking News

वणी येथे होणार्‍या राष्ट्रीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोमात

बुलडाणा, दि. 09 -  अखिल भारतीय मराठी साहित्य परीषदेच्या वतीने येत्या 21 व 22 मे रोजी विदर्भात प्रथमच यवतमाळ येथील वणी येथे 24 वे अखिल भारतीय नवोदीत मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून त्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. या संमेलनाच्य संमेलनाध्यक्षपदी अ‍ॅड पुरुषोत्तम खेडेकर, तर स्वागताध्यक्षपदी इंजि.विजयकुमार ठुबे व स्वागताध्यक्षपदी वखार महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार ठुबे राहणार आहेत. दोन दिवस चालणार्‍या साहित्य संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने होणार असुन उद्घाटन समारंभ, राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ, पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन, प्रकट मुलाखत, चर्चासत्र असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, व्रुत्तवाहिनीचे संपादक तसेच  चित्रपट, नाट्यक्षेत्रातील नामवंताची उपस्थीती लाभणार आहेत.
साहित्य परीषदेच्या वतीने विदर्भात प्रथमच  होवु घातलेल्या  नवोदीत मराठी साहित्य संमेलनात जास्तीत जास्त साहित्यीक व रसीकांनी सहभागी होण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष विशालराजे बोरे सरचिटणीस गोपाल नारे समवेत कार्यकारी समितीने केले आहे.