Breaking News

28,180 शेतकर्‍यांना मिळणार तुषार संचाचे थकीत अनुदान

आ.बोंद्रे यांनी आढावा बैठकीत उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर मुख्यमंत्री यांचे निर्देश

बुलडाणा, दि. 09 - तुषार व ठिबक संचासाठी पुर्व संमती घेवून संच बसविणार्‍या शेतकर्‍यांना शासनाकडून थकीत अनुदान मिळावे, यासाठी सभागृहात वारंवार विषय उपस्थित करण्यात आले, त्यावर चर्चाही झाल्या, परंतु पहिल्यांदाच सन 2013-14 व 2014-15 या वर्षात बुलडाणा जिल्हयात पुर्व संमतीशिवाय ठिबक व तुषार संच बसविणारे 28180 शेतकर्‍यांना मिळणारे अनुदान रखडून पडले होते. मात्र पुर्व संमतीशिवाय ठिबक व तुषार संच बसविणारे शेतकर्‍यांचे 87 कोटी रूपये अनुदान थकीत अनुदान प्रश्‍न आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी प्रथमच बुलडाणा जिल्हयाच्या भेटीसाठी आलेले मुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्या समोर हा प्रश्‍न उपस्थित केला, असता बुलडाणा जिल्हयातील अनुदानापासून वंचित पुर्व संमती न घेतलेल्या वचिंत शेतकर्‍यांची संख्या पाहता मुख्यमंत्री यांनी ज्या शेतकर्‍यांनी पुर्व संमती शिवाय सन 2013-14 व 2014-15 या वर्षात संच बसविले त्यांचे थकीत अनुदान 87 कोटी रूपये तात्काळ देणार असल्याचे स्पष्ट केले व बैठकीतच अधिकार्‍यांना संबंधीत प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले. बुलडाणा जिल्हयातील पुर्व संमतीशिवाय ठिबक व तुषार संच बसविणार्‍या शेतकर्‍यांच्या या प्रश्‍नामुळे व त्यासाठी आमदार राहुलभाउ बोंदे्र यांच्या सजक प्रयत्नामुहे जिल्हयातील शेतकर्‍यांबरोबरच राज्य भरातील अशा प्रकारचे पुर्व संमतीशिवाय ठिबक व तुषार संच बसविणारे शेतकर्‍यांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुर्व संमतीशिवाय ठिबक व तुषार संच बसविणारे शेतकर्‍यांचे अनुदाना संदर्भात यापूर्वी सभागृहात चर्चा झाली नव्हती, मात्र आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी आढावा बैठकीत हा प्रश्‍न उपस्थित करून त्याची गंभीरता मुख्यमंत्री यांच्या लक्षात आनून दिली.
त्याच बरोबर राज्यात  शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात असतांना 7/12 नसलेल्या बरोबर ई क्लास, एफ क्लास व गावठाण जमीनीवर अतिक्रमन करून राहणार्‍या कुटूंबियांना शौचालय अनुदान मंजुर केले जात नाही. परंतु राज्यातील अनेक कुटूंबाकडे स्वत:ची राहण्याची जागा नाही, परीणामी त्यांनी ई क्लास, एफ क्लास, किंवा गावठाण जमीनीवर अतिक्रमन करून घरे उभारली आहे. त्यांनाही शौचालक निर्मीतीसाठी शासनाकडून दिल्या जाणारे अनुदान दिल्या गेले पाहीजे अशी बाब आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी मुख्यमंत्री महादेया समोर उपस्थित केली, असता शौचालय अनुदानासाठी जर ई क्लास, एफ क्लास, किंवा गावठाण जमीनीवर घर अतिक्रमन करून उभारले असेल तर शौचालयासाठी शासनाकडून दिले जाणारे अनुदान त्या कुटूंबियाना दिल्या गेले पाहीजे व जे अधिकारी अशा प्रकारे अनुदान देणार नाहीत त्यांचेवर कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट करून संबंधीत अधिकार्‍यांना तसे आदेश दिले.
जळगांव जामोद येथे झालेली आढावा बैठक यात अनेक प्रश्‍न समोर आले. मात्र आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी शेतकर्‍यांची थकीत ठिबक व तुषार संचाचे अनुदान, पुर्नगठीत कर्जामुळे अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्या व त्यामुळे शासकीय मदतीपासून वंचित शेतकरी कुटूंबिय आणी ई क्लास, एफ क्लास, किंवा गावठाण जमीनीवर अतिक्रमन करून राहणारे कुटूंबियासाठी नाकारले जात असलेले शौचालय बांधकामाचे अनुदान हे प्रश्‍न उपस्थित करून बुलडाणा जिल्हयातील  वंचित शेतकर्‍यांना न्याय मिळवून देतांनाच राज्यभरातील हा प्रश्‍न असलेल्यांचे समोरील अडचणी दुर करून घेतल्या हे विशेष. कारण अशाच प्रकारचे शौचालय बांधकामाचे, शेतकरी आतमहत्याचे व तुषार ठिबक सिंचनाच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्‍न बुलडाणा जिल्हया बरोबरच संपुर्ण राज्यातही असल्याने मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाचा फायदा राज्यभर होणार आहे.