Breaking News

एकलहरे सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी लालमोहंमद जाफरमिया जहागीरदार यांची बिनविरोध निवड

श्रीरामपूर, दि. 06 - ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची मातृसंस्था समजल्या जाणार्‍या श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी लालमोहंमद जाफरमिया जहागीरदार यांची तर व्हा.चेअरमनपदी सौ.शहेनाज इक्बाल शेख यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा श्रीरामपूर सहा.निबंधक कार्यलयातील निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दत्तात्रय वाकचौरे यांनी केली.
 जान-फेब्रुवारी-2017 च्या दरम्यान मध्ये या संस्थेची सन 2016-17 ते 2021-22 या पंचवार्षिक करिता 13 जागे करिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता उमेदवारी अर्ज दाखल अखेर निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे 13 शेतकरी सभासदांनी संचालक पदासाठी अर्ज दाखल केले होते दुसर्‍या दिवशी सकाळी या आलेल्या 13 अर्जाची छाननी होऊन ते मंजूर करण्यात आले होते.मात्र राज्य शासनाने प.स व जि.प रणधुमाळीत सहकारी संस्थांच्या निवडणुका दोन महिन्यांच्या कालावधीसाठी संपूर्ण राज्यातील विशेषतः एकलहरे सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया छाननी नंतर 2 महिन्या करिता थांबविण्याचे आदेश दिले होते त्यानुसार एकलहरे सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया हि थांबविली गेली. प.स व जि.प निवडणूक प्रक्रिया संपताच शासनाने पुन्हा आदेश काढून सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे सुरळीत केल्या. एकलहरे सोसायटीच्या निवडणुकीत 13 जागेकरिता 13 अर्ज आल्याने व छाननीत सर्व अर्ज मंजूर झाल्याने निवडणूक प्रशासनाने 19 एप्रिल 2017 ला निवडणूक बिनविरोध घोषित केली.
निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी श्रीरामपूर येथील सहा.निबंधक कार्यलयात पदाधिकारींची दि.5 मे 2017 स.11.30 वाजता संचालक मंडळाची बैठक घेऊन संचालकातून चेअरमन पदासाठी लालमहंमद जाफरमिया जहागीरदार तर व्हा.चेअरमन पदासाठी सौ.शहेनाज इक्बाल शेख ह्या दोघांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. दत्तात्रय वाकचौरे यांनी जहागीरदार व सौ.शेख यांची बिनविरोध निवड घोषित केली या प्रसंगी संचालक सर्व श्री.अनिस आजम शेख,गुलाब नवाब शेख,नूरअहेमद आजम शेख,इम्रान महेमूद सय्यद,शौकत नूरमहंमद शेख,दीपक मोहन शितोळे,ब्राव्हन भिका गव्हाणे,सौ.समीना मुश्ताक शेख,अनिल लहानू विश्‍वासे,दिलीप साहेबराव पालवे,फतरू रोशन शेख हे संचालक हजर होते. शेवटी आभार संस्थेचे सचिव तागड यांनी मानले. दरम्यान चेअरमन व व्हा.चेअरमन निवडी अगोदर एकलहरे येथील प्रगतीशील शेतकरी अन्सारभाई शेख, युवा नेते रिजवान लालमहंमद जहागीरदार व शौकतभाई शेख यांची बैठक होऊन वरील दोन नावास मान्यता देण्यात आली होती. त्यामुळेच हि निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली यामुळे एकलहरे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.