Breaking News

व्यवसाय हाच तरुणाईच्या उत्कर्षाचा योग्य मार्ग-गुरुवर्य भास्करगिरी महाराज

नेवासा, दि. 06 - नोकरी मिळत नसलेल्या तरुणाईने हताश न होता जीवनाच्या उन्नतीसाठी व्यवसाय हाच तरुणाईच्या उत्कर्षाचा योग्य मार्ग असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.
नेवासा येथील एस.टी.स्टँडसमोरील बदामबाई हायस्कूल कमानीसमोर नव्याने सुरु करण्यात आलेल्या श्रीया वस्त्रदालनाचे उदघाटन श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड व सौ.गायकवाड यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आले तर गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.वस्रदालनाचे प्रमुख कृष्णा गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले . गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी कृष्णा गायकवाड या युवकाने सुरु केलेल्या नविन व्यवसायाचे यावेळी कौतुक केले.   यावेळी हभप बाळू महाराज कानडे,प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे,पत्रकार सुधीर चव्हाण, रमेश शिंदे,सुहास पठाडे,मकरंद देशपांडे,पवन गरुड, नारायण लोखंडे, रहेमानभाई पिंजारी,राजेंद्र मुथ्था, आदि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.