Breaking News

तुर खरेदी न झाल्यास अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासणार

जिल्हयात शेतकर्‍यांच्या झालेल्या शासकीय तुर खरेदी कोंडीमुळे कॉगे्रस आक्रमक...

बुलडाणा, दि. 06 - संपुर्ण जिल्यातील शासनाच्या विविध तुर खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांसमोर आडथळे निर्माण करीत येनकेन प्रकारे तुर खरेदी टाळण्याचे प्रकार खरेदी केंद्रावर आधिकार्‍यांकडून शेतकर्‍याची केली जाणारी कोंडी, खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे देण्यास केला जाणारा विलंब यामुळे बुलडाणा जिल्हयातील शेतकरी त्रस्त असतांना व आता केंद्रावर शेतकर्‍यांनी आनलेली तुरचं खरेदी करायची असा फतवा शासनाने काढलेला असतांना घोषणा होवूनही अदयापपर्यंत अनेक केंद्रावर विविध कारणे समोर करून तुर खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे हवालदिल शेतकर्‍यांना दिलासा देण्यात यावा व शेतकर्‍यांची आलेली तुर दिलेल्या मुदतीत संपुर्णपणे खरेदी करावी व तातडीने चुकारे देण्यात यावे शिवाय 22 एप्रिल नंतरही शेतकर्‍यांनी आनलेली तुर खरेदी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा कॉगे्रस कमिटीच्या वतीने आज दिनांक 04 मे 2017 रोजी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी बुलडाणा यांचेकडे करण्यात आली असून मुदतीत तुर खरेदी न झाल्यास संबंधीत यंत्रणेच्या अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासु असा ईशारा देण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्हयात होणार्‍या शासकीय तुर खरेदी केंद्रावरील शेतकर्‍यांच्या समस्या संदर्भात बुलडाणा जिल्हा कॉगे्रसने वेळोवेळी विविध आंदोलनाव्दारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यात 21 एप्रिल 2017 रोजी रोजी जिल्हयातील प्रत्येक तालुका स्तरीय ठिय्या आंदेालन तर 29 एप्रिल 2017 रोजी जिल्हाभर प्रत्येक तालुका स्तरावर उठबशा आंदोलन करून तहसिलदारांना निवेदनही देण्यात आले होते. निवेदनामध्ये शेतकर्‍यांचा तुरीचा पुर्ण माल खरेदी करण्यत यावा, तुरीचे चुकारे त्वरीत अदा करण्यात यावे, सर्व ठिकाणी त्वरीत बारदाना उपलब्ध करून दयावा, 22 एप्रिल 2017 पर्यंत तुर खरेदी केंद्रावरील जमा असलेली तुर खरेदी करण्यात यावी, तसेच 22 एप्रिल 2017 नंतरही शेतकर्‍यांनी विकीसाठी आनलेली तुर खरेदी करण्यात यावी, संत गतीने सुरू असलेली तुरीची खरेदी जलद गतीने सुरू करण्यात यावी, यासाठी वरील आंदोलने कॉगे्रसच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हयात दोन एजंन्सी मार्फत तुर खरेदीचे काम सुरू असूनही खरेदीच्या कामात गती नाही. अशाच संत गतीने खरेदी होत राहील्यास आगामी दोन महिन्या पर्यंतही खरीदीचे काम सुरू राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थीतीत येणारा खरीप हंगाम आणी त्यासाठी शेतकर्‍यांना कारावी लागणारी तयारी हंगामाच्या तरतुदीसाठी पैसा उभा करण्याचा बिकट प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे.
शासकीय तुर खरेदीतील शासनाच्या व त्यांनी नेमूण दिलेल्या एंजन्सीच्या अधिकार्‍याकडून केली जाणारी अक्ष्मय दिरंगाई पाहता या कामाला गती देणे गरजेचे झाले असून येत्या 10 दिवसात खरेदी केंद्रावरील संपुर्ण तुर आणी शेतकरी आणनार असलेली तुर खरेदी न केल्या गेल्यास व या कामात टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.