उन्हाची तिव्रता वाढल्याने पाणी टंचाईचा पिकांना फटका
संगमनेर, दि. 11 - सध्या सर्वत्र उष्णतेची लाट निर्माण झाली असून सकाळी 8 वाजेपासूनच उन्हाची तीव्रता भयंकर जाणवत आहे. त्यात लग्न सराईची धुम सुरु असल्याने विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ही नागरीक घराबाहेर पडायला तयार नाही. या निमंत्रण पत्रिका सोशल मिडीयावरुन पाठविल्या जात असल्याचे चित्र आहे.
लग्न सोहळा म्हटले की, पाहुणे, मिम मंडली, आप्तेष्ठ आदींना घरपोहच निंमत्रण दिले जाते. मात्र यातून अनावधानाने चूकून एखादे नित्रंत्रण राहिले तर रुसवे भुगवे आलेच. मात्र वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी सोशल मिडयाचा चांगलाच उपयोग होत आहे. दिवसभरात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भर उन्हात निमंत्रण पत्रिकेचे वाटपाचे काम काहींना नकोसे वाटत आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
दुपारी 12 नंतर उष्णतेच्या तीव्रतेत कमालीची वाढ होत असल्याने गेल्या 15 दिवसांपासून दुपारचे वेळी जोरदारपणे वारा वाहत असल्याने रस्त्याने धुळीचे लोटचे लोट निर्माण होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालविणे मुष्कील झाले आहे.
वातावरणातील बदलामुळे यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता कमी जाणवेल असा अंदाज काहींनी वर्तविला होता. मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले. परिणामी या तापमान वाढीमुळे नागरिकांचे आरोग्यही बिघडू लागले आहे. दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे नागरिक टाळत आहे. तर कामानिमित्त बाहेर जाणारे नागरिकही दुपारच्यावेळी रस्त्याने ये-जा करण्यास टाळाटाळ करत आहे. मात्र लग्न सराईमुळे नागरीकांना विवाहस्थळी जाणे भाग पडत असल्याने उन्हाचा कडाका असूनही प्रवास करणे टाळता येत नाही.
एप्रिल मे महिना म्हटला की लग्न सराई. आहेरासाठी साहित्य खरेदी, बस्त्यासाठी कापड दुकान, मिठाईची दुकाने, थंडपेयाची दुकाने या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गर्दी असते. सराईमुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. येथे कपड्यांची व भांड्याची, फर्निचरचे शोरुम, मंगल कार्यालयांची संख्या जास्त असल्याने उन्हाची तिव्रता असूनही शहरात सातत्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. उन्हापासून बजावासाठी नागरिक आता थंड पेयांकडे वळले आहे. पंखे, कुलर, वातानुकूलीत यंत्राचा वापर वाढला आहे. उष्णता असल्याने थंड पेयांची दुकाने गर्दीने फुलून गेले आहे. शहरात ट्राफीक जाम होत असून वाहनचालकांना आपली वाहने पार्कींगसाठी सोय होत नाही. ट्राफीक जाम होवू नये म्हणून ट्राफीक पोलिसांना मोठी कसरत करावी लागतांनाचे चित्र दिसत आहे. असेच चित्र ग्रामीण भागातही पहावयास मिळत आहे.
उन्हाची तिव्रता वाढू लागल्याने तालुक्यात विहीरींच्या पाण्याची पातळी घटत चालली असल्याचे निर्दशनास येत असून इतर जलस्त्रोतही आटण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी बोअरवेलचे पाणी गायब होण्याचेही प्रकार घडत असून आगामी काळातील शेती पिके धोक्यात येणार असल्याची चर्चा आहे. शेती पिकांना पाणीटंचाईचा फटका बसणार असल्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.
सध्या सर्वत्र कड उन पडत असल्याने तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाच्या उकाडयाने नागरीकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यात महावितरणने आठ तासाचे भारनियमन सुरु केल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल होत आहे. सध्या उष्णतेच्या तीव्र लाट असल्याने नागरीक कुलर व फॅनसारख्या उपक्रमाचा वापर करुन शरीलाला थंडावा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ग्रामीण भागात भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली आहे. काही ठिकाणी पाणी आहे तर विज नाही. त्यामुळे शेतीला पाणी देणे मुष्कील झाले आहे. सध्या प्रवरा नदी पात्रात शेतीसाठी आवर्तन सोडले आहे. अनेक गावांमध्ये शेतकर्यांनी नदीवरुन पाईपलाईन केली आहे. मात्र विजेच्या भारनियमनामुळे शेतीला पाणी देणे जिक्रीचे होवूनबसले आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे नागरीकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात बिबट्याची दहशत असतेच. रात्रीच्या सुमारास विजेचा प्रवाह बंद झाल्यास घरात झोपले तर उकाड्याला सामोरे जावे लागते. बाहेर झोपले तर बिबट्याची दहशत आणि डासांचा त्रास यामुळे बाहेरही झोपणे मुष्कील होवून जाते. रात्रभर डासांच्या सानिध्यात झोपणं अवघड होवून जाते.
भ्ाुगर्भातील पाणीपातळी कमी होत चालली असून शेतकरी वर्गाने ठिबक सिंचनाचा वापर केल्यास मोठया प्रमाणावर पाण्याची बचत होवून उत्पादन वाढीस व खर्चात बचत होण्यास मदत होईल.