Breaking News

सोन्याचे दर सहा आठवड्यांच्या नीचांकावर

नवी दिल्ली, दि, 04 - सोन्यांच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली घसरण सुरुच आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.  दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 29 हजारांहून कमी झालेत. प्रति तोळा सोन्याचे दर 270 रुपयांनी घसरत ते 28,800 रुपयांवर पोहोचलेत. गेल्या सहा आठवड्यांतील हा नीचांकी स्तर आहे.
सोन्याच्या मागणी घटल्याने त्याचे परिणाम किंमतीवर पाहायला मिळतायत. चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळतेय. चांदीच्या दरात 650 रुपयांची घट होत ते 38,850 रुपयांवर बंद झालेत.  दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 28,800 आणि 28,730 रुपयांवर बंद झाले. याआधी पहिल्या तीन दिवसांत सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले.