गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी
नवी दिल्ली, दि, 04 - गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची मागणी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील मेओ पंचायत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहेत. अलवर येथे गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात पेहलू खान या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. खान यांच्या मृत्यूनंतर एक महिन्यानंतर बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी मोदी यांच्याकडे करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा. बेकायदेशीरपणे गायींची तस्करी करणा-यांवर निर्बंध आणण्यास मदत होईल. त्याचबरोबर मृत गायींपासून होणा-या अवैध व्यवसायांवर बंदी घातली जाऊ शकते. पंचायतीने पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पत्र लिहून याबाबत मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पंचायतीचे प्रमुख शेर मोहम्मद यांनी सांगितली.