भंडारा, दि, 04 - भंडारा जिल्ह्यात उष्माघातामुळे तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात ही घटना घडलीय. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मृतांमध्ये रोजगार हमी योजनेतील दोन कामगारांचा समावेश आहे तर शौचालय बांधकामावरील एका मजुराचा यात समावेश आहे.