कास्ट्राईबच्या वतीने दादाभाऊ कळमकर यांचा सत्कार
अहमदनगर, दि. 22 - महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने दादाभाऊ कळमकर यांची रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महासंघाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक व प्राध्यापक यांच्या संच मान्यतेमध्ये अतिरिक्त ठरणार्या सर्व शिक्षकांना समावून घेण्याचा प्रश्न मांडण्यात आला. यावेळी राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, उप महासचिव निवृत्ती आरु, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, सरचिटणीस सुहास धीवर, कार्याध्यक्ष वसंत थोरात, महिला जिल्हाध्यक्षा नंदा भिंगारदिवे, सौ. साठे आदिंसह कास्ट्राईबचे पदाधिकारी उपस्थित होते. एन.एम. पवळे म्हणाले की, एकनिष्ठ व कामाची पावती म्हणून दादाभाऊंना पदाच्या रुपाने मिळालेला हा सन्मान आहे. त्यांच्या अनुभवाचा व दुरदृष्टीचा फायदा संस्थेला निश्चित होणार आहे.