चांगले कार्य करायला कोणत्याही निमित्ताची गरज नसते
अहमदनगर, दि. 22 - नवीन तंत्रज्ञानामुळे आज लोक मोठ्या प्रमाणात सोशल मिडियाशी जोडले गेले आहेत, छोट्या-मोठ्या सामाजिक उपक्रमही आज सोशल मिडियामुळे जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहचत आहेत. त्यावरुन एक गोष्ट लक्षात येते की आज कोणतेही चांगले कार्य करतांना समाजाला काही ना काही निमित्त लागत असते. पण माझे असे मत आहे की, समाजामध्ये चांगले कार्य करायला कोणत्याही निमित्ताची गरज नसते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते युवा पुरस्कार प्राप्त अनवर मुन्नवर सय्यद यांनी केले.
वाढत्या उष्णतेचे प्रमाण व थंड खाण्या-पिण्याची आवश्यकता या बाबीला लक्षात घेऊन अनवर सय्यद यांनी स्वत:च्या कुटूंबियांना आईस्क्रीम खायला घेऊन गेले असता त्यांना निराधार मुलांची आठवण झाली आणि त्यांचे कोण लाड करणार म्हणून त्यांनी तेथूनच आईस्क्रीम घेऊन रामवाडी येथील बालभवनाच्या मुलांना आईस्क्रीमचे वाटप केले. यावेळी त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते मुबीन शेख ही उपस्थित होते.
पुढे बोलताना अनवर सय्यद म्हणाले की, सोशल मिडियामुळे आज मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करणार्या संस्था पुढे येत आहेत. निराधार, दिव्यांग, अनाथ व गरजुंची मोठ्या प्रमाणावर मदत होतांना दिसून येते ही चांगली बाब आहे. समाजाच्या प्रत्येक नागरिकांनी छोट्या प्रमाणात का होईना समाजकार्य सतत करण्याची गरज आहे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्बलता आहे जे लोकांच्या समोर येत नाही, पण त्यांच्या शेजार पाजारांना ती माहिती असते पण गरजू हा स्वाभिमानामुळे स्वत: गरज सांगायला लाजत असतो, अशावेळी त्याच्या शेजारपाजार व मित्र मंडळींनी पुढाकार घेऊन त्याची मदत करायला हवी, असे नमूद केले. अनवर मुन्नवर सय्यद यांनी स्वत:च्या मुलांबरोबर अनाथ मुलांची आठवण ठेवून आईस्क्रीम दिल्याबद्दल बालभवनच्या शिक्षकांनी त्यांचे आभार मानले.