Breaking News

भारतीय क्रिकेट संघाची नवी जर्सी सादर

मुंबई, दि. 05 - ‘ओप्पो’ या मोबाईल तयार करणा-या कंपनीने आज भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी सादर केली. त्याचबरोबर ‘ओप्पो’चा ‘एफ3’  हा स्मार्टफोनही सादर करण्यात आला. ‘ओप्पो’ कंपनीने भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’चे मुख्य  कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि ‘ओप्पो’चे अध्यक्ष स्काय ली यांच्या हस्ते ही जर्सी सादर करण्यात आली. ‘ओप्पो’आणि ‘भारतीय क्रिकेट नियामक  मंडळा’मध्ये पाच वर्षांसाठी करार करण्यात आला आहे.