Breaking News

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन

नवी दिल्ली, दि. 05 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कार प्राप्त विजेत्यांना आज ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या. ‘मी राष्ट्रीय  चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांचे अभिनंदन करतो. आम्हाला त्यांच्या कलागुणांवर आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिमान  वाटतो’, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर नमूद केले आहे. 
पंतप्रधान मोदी यांनी खासकरून दिग्दर्शक आणि अभिनेता के. विश्‍वनाथ यांची प्रशंसा केली आहे. के. विश्‍वनाश यांना दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले आहे. बुधवारी नवी दिल्लीमधील विज्ञात भवनात या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांना पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.