रविवारी सहसचिव सिध्दार्थ खरात यांच्या नागरी सत्काराचे आयोजन
बुलडाणा, दि. 06 - उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहसचिव पदी पदोन्नती झाल्याबद्दल बुलडाणा जिल्ह्याचे सुपूत्र सिध्दार्थ खरात यांच्या नागरी सत्काराचे आयोजन 7 मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजता करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात आयोजीत सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू प्रा. सुधीर गव्हाणे हे राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, प्रा. संतोष आंबेकर, माजी उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे व विश्वनाथ माळी यांची राहणार आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनाच्या वतीने सिध्दार्थ खरात यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. हर्षानंद खोब्रागडे, पुरूषोत्तम बोर्डे, रविंद्र साळवे, सुरेश साबळे यांनी केले आहे.