उन्हाळी संस्कार शिबीर व मातृवंदना समारोप
बुलडाणा, दि. 06 - निमगांव सुपोनगरीमध्ये शेवंताबाई काशिराम कळसकर विद्यालय, निमागांव व लक्ष्मीबाई शालिग्राम कळसकर प्राथ.शाळा, निमागांव ता.नांदूरा जि.बुलडाणा यांच्या संयूक्त विद्यमाने उन्हाळी संस्कार शिबीर व मातृवंदना या दोन्ही कार्यक्रमाची सांगता शाळेच्या प्रांगणामध्ये उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलाने झाली. कार्यक्रमाकरीता कु.योगीताताई राठोड, पीएसआय नांदूरा, दोन्ही पायाने अपंग असुनसुध्दा सी.ए.पदापर्यंत पोहोचणारे मा.सतिष थावराणी व त्यांच्या मातोश्री सौ.लक्ष्मीबाई थावराणी या सन्माननीय व्यक्ती मातृवंदनाच्या सत्कारमुर्ती मातांचा सत्कार स्विकारण्यासाठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय अॅड.शालिग्रामजी काशिरामजी कळसकर, अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, नांदूरा हे होते. तसेच सदाशिव क्षिरसागर, केंद्रप्रमुख निमागांव, श्रीकृष्ण इंगळे सरपंचपती निमगांव, किशोरबापू देशमुख उपसरपंच निमागांव, रघुनाथराव नसूर्डे तंटामुक्ती अध्यक्ष निमागांव, अनिल वानखडे पोलीस पाटील, निमगांव, विलास निंबोळकर, संतोष फंड, देविदास मानकर, सुनिल पवार व गावातील पालक बंधू भगीनी व शे.का.कळसकर विद्यालयाचे मुख्याध्यापक कु.उषाताई बेंडे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी आपापली मनोगत व्यक्त करुन शिबीरार्थींचे व शाळेचे भरभरुन कौतूक केले. तसेच आज घरामध्ये संस्काराचे किती महत्व आहे याबद्दल मार्गदर्शन केले.
