Breaking News

कलातीर्थ - शब्दगौरव पुरस्कार जाहीर, स्वानंद किरकिरे, गुरू ठाकुर, मनस्विनी लता रविंद्र यांचा सन्मान


पुणे,दि. 23 : थर्ड बेल एन्टरटेनमेंट तर्फे दरवर्षी ‘कलातीर्थ पुरस्कार‘ देण्यात येतात, यंदाचेवर्षी ‘कलातीर्थ पुरस्कार - शब्दगौरव‘ पुरस्कार 28 मे रोजी, सायंकाळी 5 वा. टिळक स्मारक मंदीर, पुणे येथे आयोजीत करण्यात आला आहे. सदर पुरस्काराचे 5 वे वर्ष असून यापूर्वी ‘कलातीर्थ पुरस्कार - कलागौरव‘, ‘कलातीर्थ पुरस्कार - वादनगौरव‘, ‘कलातीर्थ पुरस्कार - नृत्यगौरव‘ व ‘कलातीर्थ पुरस्कार - दिग्दर्शनगौरव‘ पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अधय्क्ष स्वप्नील रास्ते यांनी दिली. 
यंदाचे वर्षी ‘कलातीर्थ पुरस्कार - शब्द गौरव‘ पुरस्काराने मराठी चित्रपट, काव्य, साहित्य, संगीत सृष्टीमधील मान्यवरांना जेष्ठ लेखक चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये स्वानंद किरकिरे, श्रीरंग गोडबोले, दासू वैद्य, गुरू ठाकुर, किरण यज्ञोपवीत, वैभव जोशी, रोहिणी निनावे, मनस्विनी लता रविंद्र, विभावरी देशपांडे, चिन्मय मांडलेकर व जेष्ठ पत्रकार दिलीप ठाकुर यांचा समावेश आहे. याचबरोबर यंदाचे वर्षीपासून निवेदक कै. भाऊ मराठे ह्यांच्या स्मरणार्थ ‘भाऊ मराठे स्मृती पुरस्कार‘ देखील ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते मिलींद कुलकर्णी व धनश्री लेले यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पडद्यामागे महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या 11 पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञांनादेखील अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते सन्मानपत्राने गौरविण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे आगामी प्रदर्शीत होणार्‍या मराठी चित्रपट व मालीकांमधील कलाकारांशी मुक्तसंवाद व गप्पागोष्टी हे देखील सोहळ्याचे विशेष आकर्षण असल्याचे त्यांनी सांगितले.