मंत्रिपदाचा उपयोग वंचितांना न्याय देण्यासाठी करणार - रामदास कदम
रत्नागिरी, दि. 11 - शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी राज्याचा मंत्री म्हणून नव्हे तर शिवसेनेचा एक मावळा म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे वंचितांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी शिवसैनिक म्हणून मंत्रिपदाचा उपयोग करेन, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.
वाकवली (ता. दापोली) येथील गावभेट कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आज कोणतीही निवडणूक डोळ्यांसमोर नसतानाही मी सामान्यांच्या भेटीला येतो, ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. शिवसेनेने या भागाचा सार्वत्रिक विकास केलेला आहे. मात्र काही प्रलंबित काही समस्या असतील, त्याही मार्गी लावल्या जातील. यासाठी शिवसेना संघटन हे अधिक बळकट करावे. म्हणजे भविष्यात निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मदतीसाठी दारोदार फिरण्याची आवश्यकता भासणार नाही. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जोमाने वाढत आहे.
गावभेट दौर्यात श्री. कदम यांनी दापोली तालुक्याचा दौरा केला. विविध गावांत शिवसेना आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत त्यांची ही भेट झाली. यावेळी गावागावांत उत्स्फूर्तपणे जनतेकडून दाद मिळून कार्यक्रमाला ठिकठिकाणी मोठीच गर्दी होती. या वेळी त्यांच्या समवेत युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, जि.प. चे बांधकाम आणि आरोग्य सभापती अण्णा कदम,समाज कल्याण सभापती चारूता कामतेकर, पं. स. सदस्या भाविका धामणे, नीलेश शेठ, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.