Breaking News

शिवसेना नारायण राणेंना किंमत देत नाही : देसाई

कोल्हापूर, दि. 05 - शिवसेना नारायण राणेंना किंमत देत नाही, असा प्रहार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या शिवसेना  पक्षप्रवेशाच्या बातमीच्या चर्चेनंतर सुभाष देसाई कोल्हापुरात बोलत होते.
काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये गेल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, या बातम्या चुकीच्या असून राणे कोणत्याही पक्षात गेले तरी शिवसेनेला कोणताही  फरक पडत नसल्याचंही सुभाष देसाई यांनी म्हटलं. नारायण राणे यांना कोणी कोणत्या पक्षात घ्यायचं हा त्या त्या पक्षाचा प्रश्‍न आहे. राणे कोणत्याही पक्षात गेले  तरी शिवसेनेला कोणताही फरक पडत नाही, सुभाष देसाई म्हणाले.