शहिद जवानांबाबत अखिलेश यादवचे वादग्रस्त विधान
नवी दिल्ली, दि. 11 - उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण भारतासह अन्य भागांतील जवान शहिद झाले आहेत. मात्र गुजरातमधील कुणी जवान शहिद झाला आहे का, असा प्रश्न उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विचारला. यादव यांच्या या विधानावरून देशभरात संतापाची लाट पसरली असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
भाजप केवळ शहिद, देशभक्ती व वंदे मातरम या मुद्यांवरच राजकारण करत आहे. सैनिकांचे शीर धडापासून वेगळे केले जाते आणि सरकार त्यावर काहीही करताना दिसत नाही, असेही यादव यांनी म्हटले आहे.
जो संदेश यादव देऊ इच्छितात तो जनता मान्य करू शकत नाही. निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर त्यांना मानसिक धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिली.