वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा ; मनपाची विकासकामे नागरीकांची डोकेदुखी
। शहरामध्ये अनेक ठिकाणी विकास कामांचे नाव करत खोदकाम जोरात
येथील महानगरपालिका हद्दीमध्ये सध्या चौका चौकात विकास कामांच्या नावाखाली खड्डे खोदून काम सुरु आहे. यातुन वाहतुक व्यवस्था पुर्णपणे कोलकडत असुन उन्हाच्या तिव्र झळाया सोसुन नागरीकांना ये - जा करणे अवघड होत आहे. शहरातील दिल्लीगेट ते सर्जेपुरा भागात तर रस्ता खोदुन मनपाने वेगळीच डोकेदुखी केली आहे. सर्जेपुरा ते दिल्लीगेट रस्ता म्हणजे सध्या अपघातांना आमंत्रण देणारा रस्ता ठरत आहे.अहमदनगर, दि. 11 - शहरामधील नगर पुणे रस्त्यावरील सक्कर चौकामध्ये महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या ड्रेनेज जाईन कामाच्या परिणामी प्रचंड वर्दळीच्या या चौकामध्ये वाहतुक कोंडी ही नित्याची बाब आहे. गेल्या 20 ते 25 दिवसांपसून मनपाने ड्रेनेज लाईनचे काम सुरु केले आहे. परंतु येथील खड्डा बुझविण्यासाठी मपनपाच्या ठेकेदाराकडे वेळ नसल्याने वाहतुक कोंडी आणि पायी चालणार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वेळोवेळी विकास कामांच्या नावाखाली रस्ते खोदुन वर्षानुवर्ष नमके काय काम सुरु असते हे नगरकरांना न उलगडणारे कोड आहे. शहरातील अनेक रस्ते मनपाच्या कामासाठी खोदुन त्यांवर मलमपट्टी करण्याची मनपाची जुनीच पध्दत असुन शहरातील एकही रस्ता सध्यातरी पुर्णपणे सक्षम राहिलेला नाही. तसेच शहरातील गल्ली बोळीमध्येही रस्ते खोदुन वेळोवेळी का सुरु असल्याने नागरीकांना ये - जा करण्यात मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु याकडे ना नगरसेवक, ना महपौर, ना अधिकारी यांच्या सर्वांच्या या कुचकामी यंत्रणेमुळे शहरात वाहतुकीचे तिनतेरा आणि नऊबारा वाजले आहे. शहरातील ठिक ठिकाणी खोदकामांची बेरीज केली तर असे पहायला मिळेल की मनपाच्या ठेकेदारांना काही तरी बक्षिस देण्यात यावे. कारण त्यांची कामाची तत्परता इतकी वाढली आहे की वेळोवेळी खड्डे खोदून काम करत असताना दिसतात. यामध्ये काही मलिदा मिळतो की काय असाच काहीसा प्रश्न नगरकरांना सतावत आहे. शहरातील ड्रेनजे लाईन, पाईपलाईन किंवा इतर कामांसाठी खोदकामातुन नगरकरांना कधी सुटका मिळणार असाच सवाल आता नगरकरांकडून विचारला जात आहे.
