Breaking News

दिल्लीमध्ये नक्षलवाद्यांना शस्त्रांचा साठा पुरवणा-या टोळीचा प्रमुख अटकेत

नवी दिल्ली, दि. 12 - दिल्लीमध्ये नक्षलवाद्यांना शस्त्रांचा साठा पुरवणा-या टोळीच्या प्रमुखाला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रिछपाल सिंग असे या आरोपीचे नाव आहे. रिछपाल हा मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रांच्या साठ्याचा पुरवठा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हेगारांना आणि नक्षलवाद्यांना शस्त्रांचा साठा पुरवणारा प्रमुख आरोपी रिछपाल हा दिल्लीत असल्याची माहती पोलिसांना मिळाली होती.