Breaking News

राजस्थानातील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांनी जाहीर केली 2 लाखांची मदत

नवी दिल्ली, दि. 12 - राजस्थानमधील भिंत कोसळून 25 ठार झाल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. या घटनेत मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजस्थानातल्या भरतपूर जिल्ह्यात चामुंडा माता मंदिर भागात बुधवारी रात्री वादळी वारे आणि पावसामुळे एका लग्नाच्या हॉलची भिंत कोसळल्याची घटना घडली. त्यात 25 जण मृत्युमुखी पडले.