Breaking News

मध्य प्रदेशमध्ये ट्रक उलटून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू; 15 जखमी

भोपाळ, दि. 12 - 11 मे,मध्य प्रदेशमधील जबलपुर परिसरात आज पहाटे ट्रक उलटून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 जण जे आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. या ट्रकमध्ये वन विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांना प्रत्येकी 1 लाख, गंभीर जखमींना 50 हजार तर जखमींना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.