कोटेश्वरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी उद्या ग्रामस्थांचे श्रम दान
रत्नागिरी, दि. 30 - दापोलीजवळच्या शिरसिंगे गावातील लुप्त झालेल्या कोटेश्वरी (कोडजाई) नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या नदीच्या प्रवाहाला पुन्हा एकदा जीवदान मिळावे म्हणून ग्रामस्थ येत्या बुधवारी (दि. 31 मे) श्रमदान करणार आहेत. केवळ जलयुक्त शिवारावर अवलंबून पाण्याचे संवर्धन करण्यापेक्षा गावकर्यांनी पुढाकार घेण्याचे ठरवले असून ग्रामस्थ समृद्ध कोकण आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘जलचेतना चषक’ (वॉटर कप) मध्ये सहभाग घेणार आहेत. जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांचे शिष्य पर्यावरण तज्ज्ञ संदीप अध्यापक आणि शिरसिंगे गावचे सरपंच आणि प्रोम ग्रुपचे संचालक तुषार जोशी यांच्या उपस्थितीत श्रमदानाला प्रारंभ होणार आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता दापोली-खेड रस्त्यावरील शिरसिंगे गावात हे श्रमदान होणार आहे.