Breaking News

उज्वला योजनेमुळे महिलांना सन्मान - खा. अनिल शिरोळे

पिंपरी, दि. 30 - प्रधानमंत्री उज्वला योजना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबाला गॅस जोडणी बरोबरच त्या कुटुंबातील महिलेला सन्मान मिळवून देणारी पंतप्रधान नरेंद्र  मोदी ह्यांच्या अतिशय जिव्हाळ्याची योजना असल्याचे प्रतिपादन खा. अनिल शिरोळे ह्यांनी केले आहे. पुणे शहर/जिल्हा विभागातील उज्वला योजनेच्या शुभारंभाच्या  कार्यक्रमात ते बोलत होते. ह्या प्रसंगी नगरसेवक धिरज घाटे, एचपीसीएल चे पुणे विभाग प्रबंधक अनिमेश कुमार, उज्वला योजनेच्या मुख्य समन्वयक अधिकारी  अनघा गद्रे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमात ॠर्ळींश खीं णि अंतर्गत सबसिडी सोडणार्या नागरिकांचा देखील सत्कार करण्यात आला. आजचे  केंद्रातील सरकार हे  कुंवा प्यासे के पास घेऊन जाणारे सरकार आहे. गॅस कनेक्शन देतानाच डीबीटी ( डायरेक्ट बँक ट्रान्सफर) मुळे भ्रष्टाचाराला आळा बसला असून  आगामी दोन वर्षात पुणे विभागातील प्रत्येकाला उज्वला योजनेद्वारे गॅस कनेक्शन देण्याची योजना यशस्वी रित्या पूर्ण करणार असल्याचे देखील शिरोळे ह्यांनी नमूद  केले. पुणे विभागात एकूण 65,000 च्या उदिष्टपैकी आत्तापर्यंत 46,803 कनेक्शन ह्या योजनेअंतर्गत वितरित झाले असल्याची माहिती योजनेच्या मुख्य समन्वयक  अधिकारी अनघा गद्रे ह्यांनी दिली आहे. धिरज घाटे ह्यांनी प्रभागातील प्रत्येक लाभार्थीला हे कनेक्शन उपलब्ध करून देनार असल्याचे सांगितले. उज्वला योजनेतून  गॅस कनेक्शन मिळविण्यासाठी जवळच्या गॅस वितरकाकडे संपर्क साधण्याचे आवाहन ह्या प्रसंगी एचपीसीएल चे पुणे विभाग प्रबंधक अनिमेश कुमार ह्यांनी केले.