Breaking News

कर्जमाफीपेक्षा शिवसेनेने कर्जमुक्तीसाठी लढावे - आठवले

औरंगाबाद, दि. 24 - शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्यापेक्षा सत्तेत राहून विरोधकांसारखे वागणे सोडावे. शेतकर्यांना कर्जमाफीची चरवश्यकता नाही तर  शेतकर्यांना कर्जातून मुक्त करण्याची गरज आहे त्यासाठी शिवसेने लढावे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी केले. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. एनडीएच्या सरकारने गेल्या तीन वर्षात अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. जीएसटी, रस्त्यांची कामे अशी अनेक  उदाहरणे त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईत होणार्या भव्य स्मारकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका त्यांनी विषद केली. 12 एकर जागेमध्ये  पाचशे कोटी रूपये खर्चून स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. देशातील  पंचतीर्थांच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. दलितांचे आरक्षण जाणार अशा अफवा मुद्दाम उठविल्या जात आहेत त्याबाबत टीका करताना ते म्हणाले  की, या सर्व राजकीय कारणांसाठी उठविल्या जाणार्या अफवा आहेत. मराठा आरक्षणाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, ज्यांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी  आहे त्यांनाच आरक्षणा लाभ दिला पाहिजे.