Breaking News

जवानांना मदत करण्यासाठी जनसेनेचे साधू संत जाणार काश्मीरमध्ये

नवी दिल्ली, दि, 04 - काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दगडफेकीला उत्तर देण्यासाठी लष्कराच्या जवानांना मदत करण्यासाठी जनसेना या धार्मिक संघटनेचे सुमारे एक हजार प्रशिक्षित साधू संत जम्मू काश्मीरला जाणार आहेत. जनसेना या धार्मिक संघटनेचे साधू संत कानपूर येथील असून ते 7 मे रोजी शहीद स्मारक नानाराव पार्क येथून रवाना होणार आहेत. या बाबतची माहिती जनसेनाचे संस्थापक बालयोगी अरुण पुरी चैतन्य यांनी दिली. पुरी जंजमाऊ येथील सिद्धनाथ मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिल्हा प्रशासनाकडे याबाबत परवानगी मागितली होती. मात्र, त्यांनी आमची परवानगी नाकारल्यामुळे आम्ही जाण्याचा निर्णय घेतल्याचे पुरी यांनी सांगितले.