ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे संरक्षण सामर्थ्यात होणार वाढ
नवी दिल्ली, दि, 04 - ब्रह्मोस ब्लॉक 3 या जमिनीवरून मारा करणा-या क्रूज क्षेपणास्त्रामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होणार आहे.
ब्रह्मोस ब्लॉक 3 या जमिनीवर मारा करणा-या क्रूज क्षेपणास्त्राचे अंदमान व निकोबारच्या बेटाजवळ दोन दिवस करण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली. उड्डाणाच्या अपेक्षित निकषांनुसार या क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य साध्य केले. आतापर्यंत क्षेपणास्त्राचे पाच वेळा यशस्वी प्रक्षेपण केले गेले . जमिनीवरून मारा करण्या-या क्षेपणास्त्रांमध्ये ब्रह्मोस या क्षेपणास्त्राने केलेली कामगिरी अतुलनीय आहे, असे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
एकामागोमाग चाचणीचे सर्व टप्पे पार करून मोठ्या शस्त्रांद्वारे मारा करण्याच्या क्षमतेत यामुळे आणखी वाढ झाली आहे. ’मोबाईल ऑटोनॉमस लॉन्चर्स’च्या पूर्ण प्रक्रियेत जमिनीवरून जमिनीवर मारा करणा-या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांची संपूर्ण क्षमतेने यशस्वी चाचणी करण्यात आली.