Breaking News

दिपक घुगे हा पुढच्या पिढीचा आयडॉल - आ. थोरात

संगमनेर, दि. 30 - तालुक्यातील छोट्याशा मालुंजे या गावातील दिपक निवृत्ती घुगे या तरुणाने स्व:कर्तृत्वाने धाडस, जिद्द व ध्यास उराशी बाळगत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत चागले गुण मिळवल्याने त्याची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली. दिपक हा संगमनेर तालुक्यातील तरुणासाठी व पुढच्या पिढीसाठी आयडॉल ठरणार आहे. असे गौरवउदगार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे भूमीपुत्र दिपक घुगे यांची  लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल व जिल्हा परिषदेच्या सभापती पदावर अजय फटागंरे यांची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कांर समारंभाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  गणपतराव सांगळे होते. यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, जि.प. कृषी सभापती अजय फटागंरे, आर. एम. कातोरे, नारायण घुगे, सुरेश थोरात, दादापाटील घुगे, राजेद्रं चकोर, बुवाजी खेमनर, भिमराज नागरे, शिवाजी सोसे, अ‍ॅड. दिलीप सांगळे, नारायण नागरे, बाळासाहेब फड, कमलेश नागरे, केशव घुगे, किरण घुगे, संदिप घुगे, नामदेव नागरे, दिनकर आंधाळे, सोमनाथ वाघ आदि मान्यवर उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा चागला असल्यामुळेच ग्रामिण भागात कोणतेही मार्गदर्शन नसताना सुद्धा येथील विद्यार्थी हे मोठे अधिकारी होत आहेत. यांचे सर्व श्रेय शिक्षक व पालकाचे असून आपण सर्वानी या शाळेशी योग्य समन्वय ठेवल्यास आदर्श शाळा निर्माण होतील. ग्रामिण भागातील तरुण हा सुविधा अभावी स्वंताःला कमी लेखत असल्यामुळे तो स्वत:चे नुकसान करत असतो. आजच्या तरुणानी आत्मविश्‍वास व संस्काराची शिदोरी घेत धाडस केल्यास निश्‍चित ध्येय साध्य होईल. यांचे मूर्तीमत उदाहरण म्हणजे आपल्या तालुक्यातील भारतीय संघाचा स्टार खेळाडू अजिक्य राहाणे हा आहे. तर दिपक घुगेनी येथेच न थांबता यूपीएससीचा अभ्यास करुन आयएस अधिकारी व्हावे व तरुण पिढीला मार्गदर्शन करुन परिसरासह तालुक्यात मोठे अधिकारी निर्माण होण्यासाठी उत्तेजन द्यावे. आई - वडील, कुटुंब व गावाला तरुणानी महत्वं दिल्यास गावातून पुन्हा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, गुगलचे सीईओ सुंदर पिलाई आदि सारखे तरुण या मातीत निर्माण होतील.
संगमनेर व सिन्नरं नाशिक परिसरातील  वंजारी समाजातील तरुणानीं  मुबंई सारख्या ठिकाणी आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. या समाजातील तरुण मिळेल ते काम करतो.  कामातूनच शिक्षण घेऊन मोठया नोकर्‍या करतात  . जर मी मुंबईला थांबलो तर एखादा सुट बुटातील अधिकारी माझ्या जवळ आला तर तो मला भेटतो आणि मी संगमनेर चा असल्याचे सांगितल्यावर मला अभिमान वाटतो. संगमनेर तालुक्यासाठी हि भुषणाची बाब आहे.  सर्वसामान्य घरातील शिक्षकाचा मुलगा पठार भागात युवकांचे घरोघरी जाऊन मोठे संगठन करुन त्यांचे प्रश्‍न सोडवतो. अशा कार्यकत्याला जिप सभापती पद दिल्याने अजय फटांगरेचा खरा गौरव आहे असे आ. थोरात यांनी शेवटी सांगितले.
याप्रसंगी अजय फटांगरे, गणपतराव सांगळे, रणजितसिंह देशमुख, किरण घुगे आदिंची भाषणे झाली.