Breaking News

ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाची ठाणे महापालिकेला भेट

ठाणे, दि. 09 - स्मार्टसिटीच्या अनुषंगाने आज मेलबोर्न सिटी कौन्सीलच्या शिष्टमंडळाने आज ठाणे महानगरपालिकेस भेट देवून मेलबोर्नमधील विविध प्रकल्पांचे सादरीकरण करून तेथील कार्यपद्धतीची माहिती दिली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. या शिष्टमंडळामध्ये जेम्स लारमोर-रेड व्हिक्टोरियन विभागीय व्यवस्थापक, ऑईन किरळे - प्लेनशेअर प्रा.लि. कंपनी, जिसेस मिशेल - व्यवस्थापक ग्लोबल रिलेशन्स, प्रेम चितेरी - संचालक, ग्लोबर सप्लाय चेन अ‍ॅन्ड लॉजिस्टीक रिसर्च रिमेट विद्यापीठ, मार्ग अ‍ॅलन - पर्यावरण, पाणी पुरवठा व नियोजन मंत्रालय, जिम टॅनर मुख्य कार्यकारी अधिकारी एन्व्हायरोस्ट्रीम सोल्युशन्स प्रा. लि., स्टीव्हेन गॉडविनो - व्यवस्थापकीय संचालक गेनिक्स व्हच्युअर्स आदींचा समावेश होता.
या वेळी ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने ठाणे महापालिकेस स्मार्ट सिटीसह इतर विविध प्रकल्पांसाठी देखील आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले. या वेळी महापलिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती मेलबर्न सिटीतर्फे आलेल्या शिष्टमंडळास दिली. यावेळी प्रभारी अतिरिक्त आयुक्त (1) संजय हेरवाडे, शहर विकास व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर आदी उपस्थित होते.