Breaking News

‘नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होणार’

मुंबई, दि. 09 - बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाईची कामे वेगात सुरु असून मे 2017 च्या पहिल्या आठवड्यात मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे 48.26 टक्के एवढी पूर्ण झाली आहेत. गेल्यावर्षी हेच प्रमाण 22.12 टक्के एवढे होते. छोट्या नाल्यांचीही कामे विभाग स्तरावर ठरलेल्या वेळापत्रकानुसार व्यवस्थितपणे सुरु आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी ठरल्यानुसार पूर्ण होतील, अशी माहिती महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक तथा पर्जन्यजलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर यांनी दिली आहे.