’कोडमंत्र’ व ’व्हेंटीलेटर’ने मारली बाजी; विजय चव्हाण यांना कलागौरव पुरस्कार
मुंबई, दि. 09 - अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 2017 हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच जोगेश्वरी येथील कमल अमरोही सटुडियो मध्ये दिमाखात पार पडला. यात ’कोडमंत्र’ या नाटकाने, तर ’व्हेंटीलेटर’ या चित्रपटाने बाजी मारली. दरम्यान, या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास असून, जीवन गौरव म्हणून मला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे, असे विजय चव्हाण यांनी सांगितले. ’या पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. संस्कृती कलादर्पणचा हा पुरस्कार मिळाल्यानंतर आणखीन नऊ जीवनगौरव पुरस्कार घेणार आणि निवृत्त होणार’ असा विनोद करत कार्यक्रमात जन आणली. तसेच रसिकांनी दिलेल्या अमाप प्रेमाबद्दल त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले. संस्कृती कलादर्पण अध्यक्षासंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे व अध्यक्षा अर्चना नेवरेकर , स्मिता जयकर यांच्या हस्ते विजय चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. या सोबतच संस्कृती कलादर्पण सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत मंडळी उपस्थित होती.