Breaking News

जिल्ह्यातुन अंतराष्ट्रीय खेळाडू घडावेत - राधेश्याम चांडक

बुलडाणा, दि. 10 - बुलडाणा जिल्ह्याचे नाव जागतीक स्तरावर पोहचविण्याकरीता जिल्ह्यातुनही अंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष  राधेश्याम चांडक यांनी सहकार विद्या मंदिर येथे विदर्भ क्रिकेट असो. च्या वतीने आयोजित बुलडाणा वाशिम विभागीयस्तर क्रिकेट प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले. 
विदर्भ क्रिकेट आसोसिएशनच्या वतीने 2 मे रोजी सहकार विद्या मंदिर येथे रणजी क्रिकेट पटू तथा व्हि.सी.ए.चे जिल्हा अ‍ॅडहॉक कमिटीचे संयोजक किशोर वाकोडे,  मुन्ना साबीर व राहुल जाधव, इम्रान खान तसेच सहकार विद्या मंदिराचे प्रशिक्षक राजेश ढाले यांच्यामार्गदर्शनाखाली बुलडाणा जिल्ह्यातील 16 व 19 वर्षाखालील  क्रिकेट खेळाडूंकरीता प्रशिक्षण शिबीर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीकरीता बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातुन 70 खेळाडू आले होते.  त्यापैकी शिबीराकरीता 42 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंना क्रिकेट प्रशिक्षण देण्याकरीता व्हिसीएने लेव्हल वन कोच किशोर वाकोडे, मोहम्मद  साबीर तथा सहकोच म्हणून इम्रान खान यांना नियुक्त केले आहे. खेळाडूंची राहण्याची व्यवस्था तसेच तिन टर्फ व्हिकेट, दोन स्वतंत्र सिमेंन्ट व्हिकेट सहकार विद्या  मंदिरामार्फत करण्यात आली तर जेवणाची व्यवस्था व्हिसीए तर्फे करण्यात आली आहे. 4 मे रोजी सकाळी 8 वाजता बुलडाणा अर्बन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष  राधेश्याम चांडक यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून रणजी क्रिकेट पटू तथा व्हिसीएचे जिल्हा अ‍ॅडहॉक कमिटीचे सयोजक किशोर वाकोडे, मुन्ना साबीर, इमरान खान, क्रिकेट  प्रशिक्षक राजेश ढाले आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करतांना राधेश्याम चांडक म्हणाले की, क्रिकेट सारख्या खेळामधून भरपुर काही  शिकण्यासारखे आहे. क्रिकेट एकाग्रता, चिंतन, पाठलाग, जिदृद, चिकाटी आणि व्यायाम या सर्व बाबी एका खेळातून येते. हा खेळ विद्यार्थी जिवनात खेळल्या गेला तर  भविष्यात त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये फायदा मिळतो. आज बुलडाणा जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नावलौकीक करत आहे. यावेळी किशोर  वाकोडे खेळाडूंना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शिबीरातुन चांगले प्रदर्शन करणारे खेळाडू व्हिसीए क्रिकेट संघात व 16 व 19 वर्षाखालील व्हिसीएच्या अंतर्गत  संघाकरीता निवड केल्या जाणार आहे.